शिवनेरी लेणी
शिवनेरी किल्ल्याच्या पूर्वेकडील लेणी गट
साधारणता तासाची चढाई केल्यावर माणूस साखळदंड आहे त्या ठिकाणी येऊन पोहचतो. वर जाण्यासाठी खालच्या बाजूस ज्या मार्गावर साखळदंड आहे, त्या मार्गावर दिशादर्शक बाण दाखवले आहेत. त्या तिथे एक मोठा लेणी समूह आहे. शिवनेरी गडावर वरती ज्या मोठ्या प्रमाणात पाण्याच्या टाक्या कोरलेल्या दिसतात, त्याचप्रमाणे या लेण्यांच्या समोरच एक पाण्याची टाकी कोरलेली आहे. उन्हाळ्यात सुद्धा या टाक्यांमधे मुबलक प्रमाणात पाणी असते. यावरून त्याकाळातील जलव्यवस्थापन हे किती उत्तम होते याची जाणीव होते. या टाक्याजवलच एक सुंदर लेणे आहे,. लेण्याच्या दारावर सुंदर असे नक्षी काम कोरलेले आहे.
लेण्यामधे बौद्ध भिक्खूंना साधना करता यावी यासाठी शैलगृहे आहेत. लेण्याच्या दाराच्या बाजूला अप्रतिम अशी खिड़की कोरलेली आहे. बेडसे लेण्यांमध्ये पण अशीच सुंदर खिड़की पहायला मिळते. या लेणी समुहातील बहुतेक लेणी या अर्धवट कोरलेली दिसतात.
या लेण्याच्या खालच्या बाजूने पुढे पायवाटेने १५ मिनिटे चालत गेल्यावर दुसरा एक मोठा लेणी समूह बघण्यास मिळतो. या लेण्यांमधे एक मोठे चैत्यगृह कोरलेले आहे. चैत्यगृहाच्या प्रवेश भिंतीवर दोन्ही बाजूला खिडक्या कोरलेल्या आहेत. तसेच प्रवेश द्वाराच्या इथे पायऱ्या सुद्धा आहेत. या लेण्याच्या उजव्या बाजुच्या भिंतीवर ब्राम्ही लिपितील एक शिलालेख कोरलेला आहे. या लेणी साठी कोणी दान दिले याचा उल्लेख त्यात आहे.
शिलालेख :१ चैत्य गृहा समोर भिंतीवर
विरसेणकस गहपतीपमुघस*
धंमनिगमस देयधंमं चेतियोघरो
नियुतो सव लोकहित सुखाय
शिलालेख :२ पाणपोढीवर
यवनस इरिलस गतान देय धमं बे पोढीयो
शिलालेख :३
अपगुरियान सवगिरियासपुतस पतिबधकस (गि)रि भूतिस (सह)भयाय सिवपालनिकाय देयधम पोढी लेण च एतस अखयनिवि.......................
शिलालेख :४
अपगुरियान सवगिरियासस पुतस पतीबधकस गिरिभूतिस सखुयारूस लेण पोढीच
(दे)यधमं एतस च लेणस पोढीय च नकरे च भिखूनीउपसयो (य)स धंमुतरियान अखयनिवि क (का)
(हा) पनानि ..... एतो लोणस चिवरिका काहाप को(ण) सोदस पोढिय चीव
(ए मत) च विसहसता पयोगा तोरिवढी सहसवढ धण उपाय्यस
...... यो उपासुयो नगरे गिरीभूतिस बितियीकायि (य) सिवपा(लि)तनिका(य).
Post a Comment