तपस्सु आणि भल्लिक
बुद्धाचे प्रथम दोन उपासक तपस्सु आणि भल्लिक
सुमारे अडीच हजार वर्षापूर्वी भारताचे नाव जम्बुदीप असे होते. प्राचिन काळापासून म्यानमार (ब्रम्हदेश) देशाशी व्यापार चालत असे.बरेच भारतीय लोक हे उत्कल या प्रदेशांमध्ये व्यापारानिमित्त गेले होते.असे मानले जे की त्यापैकी तपस्सु आणि भल्लिक अफगाणीस्थान मधील असलेल्या बहलिका शहरातील होते त्याला आज बलख असे म्हणतात की जे अफगाणिस्तान मधील मजा रे शरीफ इथून 18 किलोमीटर अंतरावर आहे . या दोन्ही भावांनी बलख जवळील असितंजण या छोट्या गावात जन्म घेतला होता .परंतु नवीन संशोधनुसार ते ऑडिसामधील उत्कल येथील रहिवाशी होते. म्यानमार मधील असलेल्या इरावती नदीच्या तटावर भारतातील बरेच व्यापारी लोक वसले होते. व ते ओडिसमधिल हे उत्कल प्रदेशातील होते या कारणामुळे त्या प्रदेशाला उत्कल देश असे समजले जाऊ लागले आणि म्हणून या प्रदेशाचा राजा जो होता त्याला उत्कलापती असे संबोधले जात असे इथूनच भारत आणि म्यानमार यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्यापार चालत असेल आणि यापैकी दोन व्यापारी म्हणजे तपस्सु आणि भल्लिक हे म्यानमार या देशात होते आणि हे दोन्ही व्यापारी म्हणजे दोन्ही सख्खे भाऊ होते मोठ्या भावाचे नाव तपस्सु लहान भावाचे नाव भल्लिक असे होते.
हे दोन्हीही बंधू म्यानमार मधून पाचशे बैलगाडीवरती आपला माल विकण्याकरता भारतामध्ये येत असत. एके दिवशी या व्यापाऱ्यांचा जत्था हा उरवेला या प्रदेशातून जात होता. त्याच वेळेस त्यांना राजायतन वृक्षाखाली एक साधू बसलेले दिसले. ते दुसरे तिसरे कोणी नसून भगवान बुद्ध होते तथागथांना नुकतेच बुद्धत्व प्राप्त झाले होते. अजून त्यांनी धम्माचा उपदेश कुणाला केला नव्हता आणि हा धम्माचा उपदेश आपण करू की करू नये किंवा कुणाला करावा या संदर्भात तथागत संभ्रमात होते. आणि त्याच वेळेस त्यांना हे दोन(व्यापारी ) उपासक भेटले. त्यांनी तथागताला बघितले तथागताच्या चेहऱ्यावरील प्रसन्नतेचे भाव त्यांची तेजोमय अशी कांती बघून दोन्हीही प्रभावित झाले. बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर तथागतांचा हा आठवा आठवडा होता. बुद्धत्व प्राप्त होण्यापूर्वी तथागतांनी सुजाताची खीर प्राशन केली होती . तथागतांना भोजन देण्यासाठी या दोन्ही बंधू कडे मध आणि तांदुळाचा जो लाडू बनवतात (मधूपिंड)अशा प्रकारचे अन्न तथागतांना दिले .
दोन्ही व्यापाऱ्यांनी तथागतांना वंदन केले आणि त्यानंतर भगवान बुद्धांनी या दोन्ही व्यापाऱ्यांना धम्म आणि पंचशीलेचा उपदेश केला. तपसू आणि भल्लिक हे तथागतांचा उपदेश एकूण प्रसन्न झाले आणि बुद्धांना आपल्याकडील काहीतरी आठवण मागू लागले. यावेळेस भगवान बुद्धाकडे देण्याकरता असे काही नव्हते म्हणून त्यांनी आपल्या डोक्यावरून हात फिरवला आणि आपल्या डोक्यातील आठ केस त्या दोन्ही बंधूंना दिले. तथागतांच्या जीवनातील ही पहिलीच अशी घटना होती की तथागतांनी आपल्या शरीरावरील धातू आपल्या उपासकांना दिले होते .यावेळेस तथागत संघ निर्माण झालेला नव्हता त्यामुळे तपसू आणि भरले यांनी पंचशीलेचा पाठ बुद्धांकडून ऐकला. भगवान
बुद्धाचे आठ केस मिळवल्यानंतर तपसू आणि भल्लिक यांनी त्यांच्या देशातील राजा म्हणजे उत्कलपती यांना निरोप दिला कि आम्ही बुद्धाचे आठ केस घेऊन येत आहोत. म्हणून राजाने सुद्धा आदरपूर्वक स्वागत करण्यासाठी आपल्या 1000 सैनिकासह समुद्रकिनाऱ्यावरती हजर झाला. तिथे एक स्तूप बांधण्यात आला व त्या स्तूपामध्ये केस धातूची प्रतिष्ठापना करण्यात आली.राजा उक्कलपती यांनी हे केसांचे अवशेष जिथे आदरपूर्वक स्थापित केले त्या स्तुपाला आज मॅनमार मध्ये त्या स्तुपाला स्स्तुवॅडेगाॅन स्तुप असे म्हणतात.
केस धातूची प्रतिष्ठापना केल्यानंतर हे दोघेही बंधू बुद्धांचा उपदेश ऐकण्यासाठी परत मगध राज्यात आले ,त्यापैकी तपस्सु यांनी चिवर घेऊन बौद्ध भिक्खू बनले आणि लहान बंधू भल्लीक यांनी स्त्रोतांपन्न अवस्था प्राप्त करून उपासकच राहिले आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार केला.
असे मानले जाते की तपस्सू आणि भल्लिक यांनी बुद्धाचे चे संपूर्ण केस न देता काही केस आपल्यासोबत बलख येथे घेऊन आले आणि आपल्या अफगणिस्तान मध्ये एक स्तूप बांधला.तों स्तूप १२०० वर्षांनंतर ह्युयंतसंग यांनी बघितला होता .
ओरिसा राज्यात २००५ मध्ये प्राचीन व्यापारी मार्गावरील राधानगर किल्ला, कायमा, धौली, तारापूर, वज्रगिरी, लांगुडी, कांतिगडीया, नेऊलपुर, पंतुरी आणि बंद्रेस्वर येथे उत्खनन करण्यात आले तेंव्हा लाल मातीची पात्रे, काळ्या रंगाची मातीची विशिष्ट भांडी प्राप्त झाली. तसेच उत्खननांत काही स्तूप, चैत्य आढळून आले. आणि मुख्य म्हणजे तारापूर व धौली येथील उत्खननात पाषाणावर धम्म लिपीत 'केसा स्तूप' , 'भिक्खू तपस्सू दानम' आणि 'भल्लिका लेणा' ही अक्षरे कोरलेली आढळली. काही संशोधकांनी तपुस्स आणि भल्लिक हे अफगाणिस्तान जवळील बल्ख प्रांताचे असल्याचे म्हटले होते. परंतु ओरिसामध्ये झालेल्या या उत्खननामुळे तेथील पुरातत्त्व खात्याने पुराव्यानिशी जाहीर केले की तपुस्स आणि भल्लिक हे बुद्धांचे प्रथम उपासक प्राचीन उत्कल प्रांतातील ( आताचे ओडीसा राज्य) होते. प्राचीन कलिंग बंदरातून व्यापारा निमित्त अनेक गलबते ब्रह्मदेश व सिरीलंकेच्या प्राचीन मंथाई बंदरात जात असत. तेव्हा सिरीलंकेत देखील व्यापारी बंधूंनी बुद्धांचा एक केशधातू नेला असा तेथील ग्रंथात उल्लेख आहे. धम्माचे बीज मिळाल्यावर तपुस्स आणि भल्लिक यांनी मोठी अध्यात्मिक प्रगती केली. राजगृह येथे पुन्हा बुद्धांची भेट घेतली. पुढे धाकटा भल्लिक अहर्त होऊन संघात दाखल झाला. तर तपुस्स याने स्त्रोतापन्न अवस्था प्राप्त केली.
Post a Comment