प्राचिन बौद्ध विद्यापीठे
प्राचिन बौद्ध विद्यापीठे
१)तक्षशिला:
प्राचीन भारतातील एक प्रसिद्ध विद्यापीठ. तक्षशिला ही नगरी प्राचीन गांधार देशाची राजधानी होती. पूर्वी भारतात असलेले हे ठिकाण सध्या पाकिस्तानात रावळपिंडीपासून वायव्येस सु. ३५ किमी. अंतरावर आधुनिक सराईकल या रेल्वे स्थानकाजवळ आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाचे प्रमुख संचालक सर जॉन मार्शल यांनी या भागात उत्खनन केले, परंतु प्राचीन विद्यापीठाचे असे फारसे अवशेष तेथे सापडले नाहीत. तक्षशिला नगरी व विद्यापीठ यांचे उल्लेख रामायण, महाभारत आणि जातकांत आढळतात. काही ग्रीक व चिनी परदेशी प्रवाशांनीही आपल्या प्रवासवृत्तांतात या विद्यापीठाचा उल्लेख केला आहे.
नागवंशीय तक्षक याने तक्षशिला नगर वसविले इ. स. पू. आठव्या शतकापासून इ. स. चौथ्या शतकापर्यंत सु. १,२०० वर्षे हे विद्यापीठ अस्तित्वात होते. या कालखंडात त्या प्रदेशावर ग्रीक, इराणी, मौर्य, इंडो–बॅक्ट्रियन, सिथियन, कुशाण वगैरे अनेक राज्यकर्त्यांच्या राजकारणाचा, संस्कृतींचा आणि भाषांचा प्रभाव पडला व त्याचा परिणाम विद्यापीठातील भाषा आणि अभ्यासक्रम यांवरही झाला. इ. स. पाचव्या शतकात हूणांनी तक्षशिलेचा पूर्ण विध्वंस केला व तेव्हापासून हे विद्यापीठ बंद पडले.
तक्षशिला विद्यापीठाची रचना ही आधुनिक विद्यापीठांप्रमाणे नव्हती. तेथे अनेक विद्यार्थी उच्च अध्ययनाकरिता भारतातील कोनाकोपऱ्यांतून व आशिया–यूरोपमधील देशांतूनही येत. प्रत्येक शिक्षक म्हणजे एक स्वतंत्र संस्थाच असे. त्याला त्याचे प्रौढ विद्यार्थी मदत करीत. एका शिक्षकाच्या हाताखाली सु. ५०० विद्यार्थी असत, असा उल्लेख जातकांत आहे. विद्यार्थ्यांच्या भोजन–निवासाची सोय विद्यापीठाच्या वसतिगृहात असे. सधन वर्गातील विद्यार्थी संपूर्ण शिक्षणाकरिता सामान्यतः एक हजार सुवर्णनाणी शुल्क म्हणून देत. निर्धन विद्यार्थी गुरूगृही राहून नेमलेली कामे दिवसा करीत आणि रात्री अध्ययन करीत. काही विद्यार्थी अध्ययन पूर्ण झाल्यानंतर पैसे मिळवून गुरुदक्षिणा देत.
प्रवेशपरीक्षेनंतर १६–१७ वर्षे वयाचे विद्यार्थी घेतले जात. शिक्षणाचा कालावधी सामान्यपणे ७–८ वर्षांचा असे. इ. स. पू. सहाव्या शतकात या ठिकाणी बनारस, राजगृह, मिथीला, उज्जयिनी इ. नगरांतून व कुरू, कोसल इ. राज्यांतून विद्यार्थी येत. कोसलचा प्रसेनजीत राजा व जीवक राजपुत्र (बिंबीसारचा अनौरस पुत्र) यांनी येथेच शिक्षण घेतले. पाणिनी व कौटिल्य यांनीही येथेच विद्यार्जन केले, असे मानले जाते. अध्यापकांच्या श्रेणीत धौम्य ऋषी, आयुर्वेदाचार्य जीवक इत्यादींचे उल्लेख येतात.
तक्षशिलेत फक्त उच्च शिक्षणाची व्यवस्था होती. सखोल अभ्यासावर भर दिला जाई. वैद्यक, धनुर्विद्या, वेदत्रयी, व्याकरण, तत्त्वज्ञान, वास्तुशास्त्र इ. प्रमुख विषय शिकविले जात. याशिवाय शल्यक्रिया, युद्धतंत्र, ज्योतिष, कृषिविज्ञान, फलज्योतिष, वाणिज्य, सांख्यिकी, विज्ञान, लेखाशास्त्र, संगीत, नृत्य, चित्रकला असे विषयही शिकविले जात. विद्यापीठात विद्यार्थ्यांना धर्मजातिकुलनिरपेक्ष प्रवेश असे. हजार–बाराशे वर्षांच्या कालखंडात ज्या ज्या राजवटींनी तक्षशिलेवर आधिराज्य केले, त्यांचा तेथील अभ्यासक्रमावर व भाषेवरही कमीअधिक परिणाम झाला. इराणी व ग्रीक संस्कृतींचे अनेक इतर विषय व संकल्पना शिक्षणक्रमात समाविष्ट झाल्या. ब्राम्ही लिपीऐवजी खरोष्ठी लिपीचा वापर अधिक होऊ लागला. ग्रीक तत्त्वज्ञान व भाषा याचाही अभ्यासक्रमात समावेश झाला असावा, असे अॅपोलोनिअसच्या वृत्तांतावरून दिसते.
हजार–बाराशे वर्षे अव्याहत शिक्षणकार्य करीत असलेले हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे एकमेव प्राचीन विद्यापीठ होते. तथापि इ. स. पाचव्या शतकात भारतात आलेला चिनी प्रवासी फाहियान याला तेथे शैक्षणिक दृष्ट्या काहीच महत्त्वाचे दिसले नाही, असे त्याच्या प्रवासवृत्तांतावरून दिसते.
२)विक्रमशिला विद्यापीठ:
बिहार राज्यातील एक प्राचीन बौद्ध विद्यापीठ. तिबेटी परंपरेनुसार मगधचा पालवंशी राजा धर्मपाल (कार. ७८०−८१५) याचा बौद्ध धर्माला राजाश्रय होता आणि त्याने विक्रमशिला विहाराची स्थापना केली. या विहाराला विक्रम नावाच्या यक्षाचे नाव देण्यात आले. या विहाराची पुढे प्रसिद्धी ‘विक्रमशिला विद्यापीठा’त परिणती झाली. धर्मपालाचे दुसरे नाव विक्रमशील असल्यामुळे या विद्यापीठाचे नाव विक्रमशीला ठेवण्यात आले. या विद्यापीठाच्या निश्चित स्थानाविषयी विद्वानांत मतभेद संभवतात. तथापि ते प्राचीन मगध देशात गंगेच्या काठी एका टेकडीवर, प्रामुख्याने भालपुरजवळ, पाथरघाट टेकडीवर, वसले होते, असे आता निश्चित झाले आहे. फणींद्रणाथ बोस यांच्या मते ते भागलपूर परगाण्यात एका टेकडीवर असावे.
नंदलाल डे आणि प्राच्याविद्यापंडित अ. स. अळतेकर, अंग राज्याची राजधानी असलेल्या चंपनगराच्या पूर्वेला ३८ किमी. दूर असलेले पाथरघाटनामक स्थान म्हणजेच विक्रमशिला असावे, या मताचे आहेत. या ठिकाणाला १८९१ साली बुचानन याने प्रथम भेट दिली. सतीशचंद्र विद्याभूषण यांनी मात्र सुलतानगंज (मागलपूर जिल्हा) हे स्थान म्हणजेच विक्रमशीला हे निश्चित केले आहे. पाटणा विद्यापीठाच्या प्राचीन इतिहास व संस्कृती या विभागाने १९६० ते ६९ मध्ये बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील अँटिकच येथे उत्खनन केले. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्यानेही १९७२-७३ पासून येथे मोठ्या प्रमाणावर उत्खनन करून विक्रमशीला विद्यापीठाचे अवशेष शोधून काढले. तेथील भव्य मठ, पाषाणाच्या बुद्धप्रतिमा, मोहोरा, स्तूप आणि भव्य जलाशये त्या काळाची ग्वाही देतात.
धर्मपाल राजाने महाविहार बांधून बौद्ध धर्मांच्या ४ प्रमुख पंथांचे प्रत्येकी २७ असे एकशेआठ अध्यापक चार विभागांत नेमले आणि महाविहारास देणग्या दिल्या. नंतरच्या पाल राजांनीही विद्यापीठास उदारपणाने आर्थिक साहाय्य केले. इतर धनिकांनीही त्यास देणग्या दिल्या. महाविहारासभोवती तटबंदी असून चार दिशांना महाद्वारे होती. प्रत्येक प्रवेशद्वारावर एक प्रवेशपरिक्षागृह होते. राजा देवपाल याने (कार. ८१५−८५५) आणखी दोन प्रवेशपरिक्षागृहे बांधली. या प्रत्येक द्वारावर विद्वान पंडिताची नेमणूक केलेली होती. रत्नाकरशांती, वागीश्वरकीर्ती, भट्टारक नरोत्पल, प्रज्ञाकरमती, रत्नवज्र, ज्ञानश्रीमित्र हे यांपैकी काही विद्वान पंडित होते.
हे सहा विहारांचे प्रमुख आचार्य होते. या आचार्यांपैकी काही विख्यात नैयायिक होते. विहाराच्या मध्यभागी महाबोधीची कलाकृती असलेले देवालय व अन्य १०८ देवालये होती. केंद्रस्थानी असलेल्या विहारास ‘विज्ञानगृह’ म्हणत. यांशिवाय येथे एक विशाल सभाभवन होते. त्यात एका वेळी आठ हजार व्यक्तींची बसण्याची सोय होती. प्रवेशद्वारात उजव्या बाजूस नालंदा विद्यापीठाचे प्रमुख आचार्य नागार्जुनाचे चित्र होते, तर डाव्या बाजूस याच विद्यापीठाचे प्रमुख ⇨अतीश दीपंकराचे चित्र होते. विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार बंद झाल्यावर येणाऱ्यांसाठी या प्रवेशद्वाराबाहेर एक धर्मशाळा होती. विद्यार्थ्यांची येथे विनामुल्य निवासभोजनाची व्यवस्था असे.
विद्यापीठात परदेशांतून तसेच भारतातील विविध भागांतून अध्ययनासाठी विद्यार्थी येत. द्वारस्थ आचार्यांकडून परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरच त्यांना प्रवेश मिळे. तिबेटी भिक्षू येथे अध्ययन करून संस्कृत ग्रंथांचा तिबेटी भाषेत अनुवाद करीत. विद्यापीठीय परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांस पंडीत, महापंडित इ. पदव्या राजदरबारात देण्यात येत व अशा पंडितांना 'राजपंडित' हे बिरूद मिळे. अशा प्रख्यात राजपंडितांमध्ये आचार्य रत्नकीर्ती, जेतारी, ज्ञानश्रीमित्र, अतीश दीपंकर, रत्नवज्र, वागीश्वरकीर्ती इत्यादींचा अंतर्भाव होता. येथील ग्रंथालय समृद्ध होते. बौद्ध धर्मातील विविध संप्रदाय, वेद, अध्यात्मविद्या, व्याकरण, न्यायशास्त्र इ. विषयांचे येथे अध्यापन होई. तंत्रमार्गाच्या अध्यापनावर, विशेषतः वज्रयान व सहजयान यांवर, येथे विशेषभर होता.
कारण इ. स. दहाव्या-अकराव्या शतकांत तंत्रमार्ग आणि तांत्रिक साधना हे बौद्ध धर्माचे प्रमुख अंग बनले होते. शिवाय न्यायशास्त्रातही ते प्रावीण होते. विद्यापीठाचे प्रशासन महाधिपतींकडे असून त्यांच्या मदतीला सहा आचार्यांचे मंडळ असे. काही काळ नालंदा विद्यापीठाचा कारभारही या मंडळाच्या नियंत्रणाखाली होता. तेथील प्रशासन उत्कृष्ट होते. ह्यूएनत्संग (सु. ६०२-६६४) व इत्सिंग (सू. ६३४−७१३) ह्या चिनी प्रवाशांच्या वृत्तांतून या विद्यापीठाचे कार्य व प्रगती यांबाबत माहिती मिळते.
खिल्जी घराण्यातील महम्मद बिन बख्तियार याने बाराव्या शतकाच्या अखेरीस बिहारवर स्वाऱ्या केल्या, पाल राजा गोविंद याचा पराभव करून त्याची राजधानी ओदंतपुरी ही जिंकून घेतली. विक्रमशिला विहाराभोवतालच्या भिंती बख्तियारला किल्ल्याचा तट वाटल्यामुळे त्यांवर हल्ला करून त्याने संपूर्ण ग्रंथालय जाळले व तेथील ब्राह्मणांना व भिक्षूंना कंठस्नान घातले (११९२). तसेच त्याने विक्रमशिला आणि नालंदा या विद्यापीठांचा विध्वंस केला.
३)नालंदा विद्यापीठ:प्राचीन भारतातील एक आदर्श विद्यापीठ. बिहार राज्यातील राजगीरच्या उत्तरेस ११·२७ किमी. अंतरावर हे विद्यापीठ होते. त्याची स्थापना इ. स. पाचव्या शतकाच्या सुरुवातीस झाली असावी. विद्यापीठाच्या स्थापनेचे व संवर्धनाचे श्रेय गुप्तवंशाच्या सहा राजांकडे जाते. काही अभ्यासक हे श्रेय बौद्ध आचार्य नागार्जुन याचा शिष्य आर्यदेव यास देतात. उत्खननात सापडलेल्या मुद्रेवर ‘श्रीनालंदा महाविहार- आर्यभिक्षुसंघस्य’ असे लिहिलेले आहे व तिच्या दोन्ही बाजूंवर सारनाथचे धर्मचक्र आहे.
नालंदा विद्यापीठाच्या सु. दीड किमी. लांब व सु. पाऊण किमी. रुंद क्षेत्रात विद्यापीठाची भव्य इमारत व वसतिगृह होते. याशिवाय सुसज्ज ग्रंथालयासाठी रत्नसागर, रत्नोदय व रत्नरंजक अशा आणखी तीन सुंदर इमारती होत्या. या ग्रंथालयाच्या विभागात धर्मगंज म्हणत. निवासासाठी ४,००० व अभ्यासासाठी १,००० खोल्या होत्या. ८,५०० विद्यार्थी व १,५०० शिक्षक होते. प्रत्येक दिवशी शंभर व्याख्याने होत. येथे राहणाऱ्यांना निवास, भोजन, कपडालत्ता, औषधोपचार व शिक्षण विनामूल्य असे. हा सर्व खर्च दान दिलेल्या १०० खेड्यांच्या उत्पन्नातून व इतर देणग्यांतून चाले.
नालंदा विद्यापीठाचा अभ्यासक्रम प्रगत, उदार आणि बहुव्यापक होता. त्यात सांप्रदायिकतेस स्थान नव्हते. बौद्ध धर्माचे भिन्न संप्रदाय, जैन धर्म, ब्राह्मणी धर्म व इतर धर्म त्याचप्रमाणे योग, व्याकरण, साहित्य, तर्कशास्त्र, शब्दविद्या, चिकित्साविद्या, गणित, ज्योतिष, चित्रकला, शिल्पशास्त्र, मंत्रविद्या, दंडनीती, वेदविद्या इ. विषय शिकविण्याची व्यवस्था होती. सत्याच्या शोधाची पहिली अट स्वातंत्र्य आहे, असे मानण्यात येई. विद्यापीठाच्या कीर्तीमुळे देशातील कानाकोपऱ्यांतून व चीन, कोरिया, तिबेट इ. परदेशांतूनही तेथे विद्यार्थी येत. द्वारपंडित घेत असलेली प्रवेशपरीक्षा अत्यंत कडक असे. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी शेकडा २० ते ३० टक्के विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळे. विद्यापीठाने आर्यदेव, सिलभद्र, कर्णमती, स्थिरमती, गुणमती, बुद्धकीर्ती, शांतरक्षित, कमलशील इ. विद्वानांची मालिका निर्माण केली. न्यायशास्त्र ही या विद्यापीठाची मोठी देणगी आहे.
चरित्र्यसंपन्न व बुद्धिवान शिक्षक, अभ्यासू व होतकरू विद्यार्थी, कुशल प्रशासन, राज्यकर्त्यांचा सतत लाभलेला आश्रय यांमुळे नालंदा विद्यापीठाची उत्तरोत्तर सतत आठ शतके भरभराट होत गेली. भारतातील अध्ययन-अध्यापनाच्या श्रेष्ठ परंपरेला सातत्य व समृद्धी लाभवून देण्यात या विद्यापीठाचा वाटा फार मोठा आहे. परंतु विक्रमशीला विद्यापीठाच्या प्रगतीबरोबर नालंदा विद्यापीठास उतरती कळा लागली आणि शेवटी तेराव्या शतकाच्या शेवटी बख्तीयार खल्जीने मोडतोड करून व जाळून त्याचा विध्वंस केला. नालंदा विद्यापीठाची आठवण म्हणून त्याच ठिकाणी बिहार सरकारच्या सहकार्याने १९५१ साली नव नालंदा महाविहार (नालंदा पाली प्रतिष्ठान) स्थापन करण्यात आले आहे.
४)वलभी विद्यापीठ:
गुजरात राज्याच्या भावनगर जिल्ह्यातील वलभी येथील एक प्राचीन विद्यापीठ. हे विद्यापीठ इ.स. सातव्या शतकात स्थापन झाले. विद्यापीठाची स्थापना व संवर्धन यांचे श्रेय मैत्रक राजांना (४६५-७७५) दिले जाते. ‘विद्येचे माहेरघर व आंतरराष्ट्रीय व्यापारबंदर’ असा वलभीचा नावलौकिक असल्याचा उल्लेख काश्मीरी पंडित सोमदेव याच्या कथासरित्सागरात व मैत्रककालीन ताम्रपटांत आढळतो. वलभी विद्यापीठात बौद्ध, जैन इ. धर्मांचे अध्यापन होत असे.
पूर्व भारतातील नालंदा विद्यापीठाशी याचे साम्य असून त्या काळी त्याची कीर्ती दूरवर पसरली होती. जैन व बौद्ध आचार्यांनी येथे धर्मप्रसारार्थ विहार बांधले. त्या काळी जैन धर्मग्रंथ लिपिबद्ध नव्हते. जैन आचार्यांनी धर्मप्रसारार्थ त्यांचे सिद्धांत लिपिबद्ध केले. वलमी येथील जैन धर्मपरिषदेत (सु. ४५४) त्यांस मान्यताही लाभली (सु. ८४ ग्रंथ). ग्रामीण उत्पन्नातून अर्थसाहाय्य व विद्यापीठास लाभलेला राजाश्रय यांमुळे जैन धर्माचे शिक्षण उपलब्ध होऊ लागले.
वलभी विद्यापीठात पाठनिर्देश व व्यावसायिक शिक्षण ह्यांना अध्यापन पद्धतीत विशेष महत्त्व होते. यांपैकी पहिल्याचा प्राथमिक शिक्षणासाठी, तर दुसऱ्याचा उच्च शिक्षणासाठी उपयोग केला जाई. विविध विषयांचे प्रात्यक्षिकही करून दाखविण्यात येत असे. कला, अध्यात्मविद्या, तर्कशास्त्र, वैद्यक इ. विषयांना अध्यापनात स्थान असे. धर्मशास्त्राव्यतिरिक्त वेदांगे, इतिहास, तत्त्वज्ञान, ज्योतिर्विद्या, भूगोल, अंकगणित, धातुविज्ञान, नीतिशास्त्र, व्रत, चिकित्साशास्त्र इत्यादींचे अध्यापन केले जाई. प्राकृत व संस्कृत हे अध्यापनाचे माध्यम असे. हे शिक्षण मोफत दिले जाई.
ह्यूएन्त्संग ह्या चिनी प्रवाशाने आपल्या प्रवासवृत्तात नमूद केल्यानुसार वलभी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या १०० बौद्ध धर्मीय विहारांत सु. ६,००० अनुयायी अध्ययन करीत होते.
५)ओदंतपुरी:
बिहार,नालंदा विद्यापीठ पासून ७ की.मी.विक्रमशिलाच्या आधीचे विद्यापीठ हे विद्यापीठ होते.
स्थापना: धर्मपाल राजेचे वडिल गोपालराम यांनी स्थापले .या विद्यापीठाचा पाहिजे तेवढा विकास झाला नाही आणि नाही.
या विद्यापीठाचा कारभार भंतेजी कडे होता.भिक्खूंना प्रशिक्षित करणे या प्रमुख उद्देश होता.
५०० भिक्खु प्रशिक्षण घेत असत.येथून लामा संस्कृती विकास पावली.बौध्द धम्माची तंत्रयान शाखा येथे कार्यरत होती.
आचार्य शांतीरक्षित आणि आचार्य आतिष हे प्रसिद्ध भिक्खु होय.
आचार्य आतिष यांनी १९ वर्ष अध्यापण केले
११९९ मध्ये बख्तियार खिलजी याने आक्रमण केले.
भिक्खुंची कत्तली केल्या.
6)पुष्पगिरी विद्यापीठ:
इ.स.पू ३रे शतक कलिंग राजांनी बनविले, चक्रवर्ती सम्राट अशोक यानी बनविले
ओडिसा, जयपूर येथे वसलेले होते.
सीमा.:तीन डोंगरांना लागून विस्तार होता
रत्नागिरी,ललितगिरी,उदयगिरी.इ.स.१९९६ ते २००६ या काळात भारतीय पुरातत्व खात्याने उत्खनन केले.शिलालेखानुसार हे विद्यापीठ सम्राट अशोक यांनी बनविले होते असे समजते.ह्युयनत्संगने आपल्या प्रवास वर्णनात लिहतो कि तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला विद्यापिठाप्रमाणे हे विद्यापीठ होते.
७)रत्नगिरी:
बिहार येथे ५ वे शतकात पाल वंशजांनी बनविले.बौद्धभिक्खु साठी हे विद्यापीठ होते.सांखिकी, तत्वज्ञान, विज्ञान, शल्यचिकित्सक इ. विषय शिकविल्या जात.
८)सोमपुरा विद्यापीठ:
वर्तमान बांगलादेश,नौवगांव जिल्ह्यातील पहाडपुर येथे आहे.पहाडपूर महाविहार म्हणून ओळखले जाते.
धर्म पाल राजांनी बनविले होते त्यापैकी हे सर्वात मोठे होते.धर्मपाल हे उत्तरापथ स्वामी म्हणून पदवी धारण केली होती.उत्खणनात भाजकी मोहर सापडली होती.त्यावर लिहले होते. श्रीसोमपुले धर्मपालते महाविहारिया भिक्खुसंघस्य
निर्माण:पाल राजवंश ७ वे शतक
विस्तार:२७ एक्कर
संख्या ८००० विद्यार्थी
शिलालेखावरुन असे कळते कि राजा देवपाल आणि पुढे
राजा महिपाल (९२५ -१०००) च्या काळात या विद्यापीठाची दुरुस्ती करण्यात आली होती.
१९ व्या शतकात ब्रिटीश इतिहास कार हॅमिल्टन यांनी शोध लावला.१९२० मध्ये के.एन.दिक्षीत यांनी डॉक्युमेंट तयार केले.
९)जगद्दल विद्यापीठ:
हे विद्यापीठ सध्या बांगलादेश मध्ये आहे.पालवंशातील राजा रामपाल (इ.स.१०७७ ते इ.स. ११२०)यांनी हे विद्यापीठ बनविले.बांगलादेशात राजेशाही जिल्ह्यातील जगद्दल या ठिकाणी हे भग्नावशेष बघायला मिळतात.रामपाल राजा कुमार अवस्थेत गादीवर बसला परंतु तो प्रतिभासंपन्न होता.गंगा व नदीकाठी रामावती हि राजधानी बनविली.रामावती याच ठिकाणी जगद्दल बुध्दविहार व विद्यापीठ स्थापन केले.अभयाकर गुप्त हे रामपाल चे गुरु होते.त्यांचा जन्म झारखंड येथे झाला होता.शुभंकर हे सुद्धा या विद्यापीठाचे आचार्य होते.संस्कृत पुस्तकाचे तिबेटी भाषेत भाषांतर केले होते.बौध्द धर्मातील ४ संप्रदाय पैकी या विद्यापीठात वज्रयान पंथाचा अभ्यास होत होता.शाक्यश्री शिलभद्र हे प्रमुख होते.जे नालंदा विद्यापीठात प्रमुख आचार्य होते.बख्तियार खिलजीनै ते नष्ट केल्यामुळे जगद्दल विद्यापीठात ते आचार्य म्हणून आले होते . तिबेट च्या बौद्ध संस्कृती रूजवण्यात जगद्दल विद्यापीठाचा सिंहांचा वाटा आहे.तंत्ययान पध्दतीने येथे धम्म आचरला जातो .विभुतीचंद्र व दानशील हे शिलभद्र चे प्रमुख शिष्य होते..लामा पध्दत येथे विकसित झाली.१२०४ पर्यंत ते येथे होते.नंतर ते तिबेट ला परत गेले.आणि १२०७ ला हे विद्यापीठ बख्तियार खिलजीने उध्वस्त केले.
१०) ओदंतपुरी विद्यापीठ :
बिहार स्थित पालवंशाच्या राजांनी बनविले.८ ते १२ वे शतकामध्ये उच्च शिखरावर होते . तिबेट पुस्तकात याचा उल्लेख आढळतो.
या विद्यापीठात १२००० विद्यार्थी शिकत असते.
आचार्य श्रीगंगा हे येथील विद्यार्थी होते जे विक्रमशिला विद्यापिठाचे आचार्य होते .
याशिवाय सम्राट अशोकाच्या काळात २३ विद्यापीठ निर्माण करण्याण आले होते.उदा.साची, उज्जैन, सारनाथ,बनारस,इ.
Post a Comment