Wakrul Caves,Hetavane Dam Khopoli,Pen
"बहुजनांच्या हिता सुखासाठी हे भिक्खुनों तुम्हीं सदैव चारिका करा आणि जो धम्म आधी ,मध्य आणि अंतिम कल्याणकारक आहे,त्याचा प्रचार आणि प्रसार करा." तथागतांचा उपदेश घराघरांंत पोहचविण्यासाठी भिक्खूनीं अवघा देश चारिका करीत ह्या मातीत धम्म रूजविला! महाराष्ट्रात सातवाहनांची सत्ता असतांना सह्याद्रीच्या डोंगर दर्यात लेणी निर्माण झाल्या. ह्या लेणी वर्षावासाच्या काळात भिक्खुंना एका ठिकाणी अधिष्ठाण घेवुन ज्ञानार्जन करावे लागे.
अशाच एका अपरिचीत वाक्रुल लेणीची माहिती आमचे MBCPR चे सहकारी राकेश गायकवाड़ सर यांनी दिली. आणि २८/०५/२०२३ रविवार हा दिवस ठरला. प्रभाकर जोगदंड सर,संतोष वाघमारे सर,निकेतन सावंत सर ,विजय शिरसाठ सर ,महेश कांबळे आणि मी रात्री सरांकडे मुक्काम करुन सकाळी ८:३० MBCPR टिमने लेणीच्या दिशेने प्रस्थान केले. खोपोली पेण मार्गावरती वाक्रुल गावाजवळ हेटवणे नावाचे धरण आहे.हे धरण नव्याने झाले आहे.या धरणामुळे वाक्रृड गावाचे विस्थापण झाले.ज्यावेळेस हेटवणे धरण नव्हते त्यावेळेस पेण वरुन हा रस्ता लोणावळा कडे येणारा होता, म्हणजेच तो भाजे,कार्ले,पाटण,बेडसे या लेणीकडे येणारा होता.खोपोली वरुन पेण कडे जातांना निंबारवाडी फाटा येथे आम्हाला पवन खरात सर ,सिध्दार्थ काळे,प्रविण खरात सर,अल्पेश मोरे सर सहभागी झाले.नाडा निंबारवाडी फाट्यावरून वळून पुढे खारबाची वाडी हे गांंव लागते.या खारबाच्या वाडीपासून उजव्या बाजूला ओढ्याच्या काठाने (हेटवणे धरणाकडे)अर्धातास चालत जाऊन ओढ्यात(प्राचिन लेणीसाठी) उतरायला काताळात कोरलेल्या पायर्या दिसतात .
समोरच भव्य असे हेटवणे धरण दिसते.ओढ्याच्या खोलीपासून जवळपास १०० फुट उंचीवर काळ्या कातळांत हि लेणी कोरलेली आहे
. जवळपास १०*१५(अंदाजे) एवढे सभागृह असून दर्शनी भागात मधोमध दोन स्तंभ आहेत. स्तंभाच्या सर्वात खाली चार कोन आहेत, त्यानंतर आठ कोन, आणि वरती १६ कोन आहेत, त्यावर सुंंदर कमळांच्या पाकळ्यांचं शिल्पांकण केलेले आहे. नंतर दोन्ही स्तंभावरती आम्लक कोरलेले आपल्याला दिसतात. छताला लागुन दोन पट्याची हर्मिका आहे.दोनपैकी एका स्तंभावरती कमळांच्या पाकळ्यांचं काम अपूर्ण आहे.दर्शनी भागातील भिंतीची बाजू अगदी गुळगुळीत केलेली आहे. उंची ०६ फुट असून, अजून उंची वाढविण्यासाठी खोदकाम केलेले दिसते. हि लेणी कान्हेरी लेणी समुहातील लेणी क्रमांक १ च्या तळमजल्यावरील लेणीशी हुबेहुब साधर्म्य आहे.
यावरून हि बुध्द लेणी आहे असे म्हणु शकतो.लेणीच्या दोन्ही बाजूला शुन्यागार किंवा भिक्खु निवासाचे काम अपुर्ण आहे. सत्ता बदल,किंवा दान कमी पडणे या कारणांमुळे कदाचित हि लेणी अपूर्ण आहे.इथे शिलालेख मात्र आढळत नाही.अशी हि सुंदर छोटिशी लेणी निसर्गाच्या कुशीत एकांतात वसलेली आहे.
Post a Comment