महामोग्गलान आणि सारिपूत्त
महामोग्गलान आणि सारिपूत्त
महामोग्गलान आणि सारिपूत्त हे तथागत भगवान गौतम बुद्धाचे
अग्रश्रावक म्हणून ओळखल्या जातात.या दोघांचाही जन्म तथागत भगवान बुद्धाच्या आधी झालेला होता.राजगिरी जवळील उपतीस्स आणि कोलित नावाच्या दोन गावात महामोग्गलान आणि सारीपुत्त यांचा जन्म झाला होता.या दोघांचाही जन्म एकाच वेळी झाला होता. ही दोन्ही गावे त्याकाळी ब्राह्मणांची होती. त्या दोघांचेही आई-वडील खूप श्रीमंत होते आणि खूप कोटीचे मालक होते त्यांचे जीवन संपूर्ण सुख समृद्धीने भरलेले होते.उपतीस्स या गावात जन्मल्यामुळे त्यांचे नाव उपतीस्स् पडले जे कालांतराने भगवान बुद्धाचा अग्र श्रावक म्हणून सारीपूत्त या नावाने प्रसिद्ध झाला. तर दुसऱ्याचे नाव कोलीत ठेवण्यात आले जे कोलित गावात जन्मले होते. म्हणून त्यांचे नाव कोलीत ठेवण्यात आले होते.त्याच्या आईचे नाव मोगली असे होते म्हणून त्यांचे नाव पुढे मोग्गलान असे ठेवण्यात आले.अशा प्रकारे मोगलीचा पुत्र असल्यामुळे ते मोग्गलान नावाने ओळखले गेले आणि आपल्या महान गुणांमुळे ते लोकांत महामोग्गलान म्हणून नावाने प्रसिद्ध झाले.
उपतीस्स आणि कोलित हे दोन्ही बालके वयानुसार व सर्व प्रकारच्या कलेत पारंगत असल्यामुळे तसेच शेजारील गांव आणि दोघांचाही जन्म एकाच दिवशी झाल्यामुळे तसेच त्यांचे कुळ धनाढय असल्यामुळे इतर बाबतीमध्ये साम्य असल्यामुळे साहजिकच त्यांच्यामध्ये एक मित्रत्व निर्माण झाले . पूर्वी पासून दोन्ही परिवारांच्या मध्ये सात पिढ्यापासून चांगले संबंध होते. हे दोघेही लहानपणी बरोबरच असायचे, खेळायचे ,अध्ययन करायचे . कुमार उपतिस्स जेव्हा खेळण्यासाठी नदी अथवा उद्यानात जायचा तेव्हा त्याच्यासोबत पाचशे सोन्याच्या पालखी असायच्या व कुमार कोलित सोबत 500 अश्वस्वार आसायचे . दोन्ही कुमारां सोबत 500 तरुण सहायक असायचे. राजगृहात दरवर्षी पहाडावर उत्सव साजरा होत असे दोघेही एकाच मंचाकावर बसत असत, एकत्र बसून उत्सव पाहत असत,
हसलेल्या प्रसंगी हसत. गंभीर प्रसंगी गंभीर होत असत व दान देण्याच्या परिस्थितीत दान देत असत.अशा प्रकारे एकदा चर्चा करतांना ते आणि ज्ञानाच्या परिपाक्तेवमुळे आधी सारखे हसणे प्रसंगी हसणे , गंभीर प्रसंगी गंभीर होणे ,तसेच दान देण्याचे वेळी दान देणे त्यांना नीरस वाटायला लागले. दोघेही चिंतामग्न होऊन विचार करीत होते की येथे पाहण्यासारखे काय आहे ? शंभर वर्ष होण्याअगोदर या सगळ्यांचे नाव निशाण सुद्धा राहणार नाही आम्हाला मुक्तीचा उपाय शोधला पाहिजे असे त्यांच्या मनात येऊ लागले.आणि दोघेही मुक्तीचा मार्ग शोधू लागले.
प्रवज्ज्या
त्यावेळी संजय नावाचा गणाचार्य हा अस्थिर मताचा आचार्य होता तो राजगृहात मोठ्या परिव्राजक समुदाया सोबत राहत होता. उपतीस्स आणि कोलितने प्रवज्जेसाठी आपल्या आई वडिलांची संमती प्राप्त केली त्यानंतर पालखीने व अश्वरथाने गणाचार्य संजय कडे गेले त्यांच्याकडून प्रवज्जा प्राप्त केली आणि आपल्या सोबत आलेल्या पाचशे तरुण सहायकांना पालख्या परत घेऊन जाण्याचे आज्ञा देऊन संजयच्या आश्रमात राहायला लागले. संजय हा खूप अस्थिर मताचा होता तो कर्म आणि कर्म फळाला, लोक आणि परलोकाला स्वीकारतही नव्हता आणि नकारातही नव्हता त्याची कोणतीच निश्चित मान्यता नव्हती तो नास्तिकेचे समर्थनही करत नव्हता आणि अस्तिकतेचेही करत नव्हता.आश्चर्य असे होते की त्याचे कोणतेही निश्चित मत नसतांना त्यांचे अनेक भक्त आणि अनुयायी होते. तरी गणाचार्य संजयच्या आश्रमात अडीचशे शिष्य होते संजय चे कोणतेही निश्चित मत नसल्यामुळे ते इतर साधुसंत आणि ब्राह्मणांनाही भेटू लागले.त्यांनी एक दुसऱ्याला वचन दिले होते की दोघांपैकी जो अगोदर अमृताचा(योग्य मार्ग) आस्वाद घेईल तो दुसऱ्याला अवश्य सांगेन..
अशाप्रकारे उपतीस्स(सारीपूत्त ) आणि कोलित (मोग्गलान) मुक्तीच्या मार्गात वेगवेगळ्या ठिकाणी फिरू लागले त्यावेळी तथागत भगवान बुद्ध राजगृहाच्या वेळूवणात विहार करीत होते. त्यादिवशी सारीपूत्त यांनी राजगृहाच्या राजधानीत आयुष्यमान परीव्राजक अस्सजी (अश्वजित) यांना भिक्षाटन करतांना पाहिले. व त्यांची संयमीत चाल, खाली झुकलेली नजर, सुआच्छादित चिवर, शांत आणि चेहऱ्यावरील तेज पाहून अत्यंत प्रभावीत होऊन त्यांच्याकडे आकर्षित झाले .त्यांना वाटले की हे अरहंत आहेत अथवा अरहंत मार्गावर आरुढ आहेत , त्यांचा परिचय प्राप्त करण्याच्या उत्कंठतेने त्यांच्या मागे मागे चालत राहिले .त्यांचे भिक्षाटन पूर्ण झाले .भिक्षू अस्सजी(अश्वजित)जेथे एकांतात जेवण करण्यासाठी बसले होते तिथे त्यांच्या जवळ जाऊन त्यांना नमस्कार करून विचारले “आपल्या चेहऱ्यावरील इंद्रिय अत्यंत शुद्ध आणि शांत आहेत . आपले आचार्य कोण आहेत? आपण कोणी शिकवलेल्या धर्माचे आचरण करीत आहात ?त्यांचा काय वाद आहे किंवा काय मत आहे?
अस्सजीने सांगितले की शाक्य कुळातून प्रवज्जित झालेल्या भगवान गौतम बुद्धाचे आम्ही शिष्य आहोत आणि त्यांनी सांगितलेल्या धर्माचे पालन करीत आहोत. तेव्हा उपतीस्सने त्यांना भगवानांच्या मता बद्दल विचारले तेव्हा अस्सजी(अश्वजित) म्हणाले आयुष्यमान मी ह्या धर्मात नुकताच प्रवज्जित झालो आहे सविस्तर तुम्हाला सांगू शकत नाही पण थोडक्यात सांगतो . तेव्हा सारीपूत्त म्हटले ठीक आहे !आयुष्यमान थोडेफार सांगा! जे आहेत ते सांगा. मला फक्त सार सांगा. "मला सारा विषयी मतलब आहे "तेव्हा आयुष्यमान भिक्षू अस्सजी(अश्वजित) यांनी थोडक्यात सांगितले की
ये धम्मा हेतुप्पभवा,तेसं हेतुं तथागतों आह I
तेसंच यो निरोधों , एवंवादी महासमनो II
जे काही कारणांनी उत्पन्न होते त्याचे कारण आणि त्याचा निरोध सुद्धा तथागत सांगतात महाश्रमानांचा हाच वाद आहे हेच सांगणे आहे , हाच उपदेश आहे.
ही गाथा एकूण त्याचे मन प्रीति सुखाने भरून गेले
त्यांनी अनुभव केला की
यं किंचि समुदय धम्मम, सब्ब् त निरोध धम्मांन्ति
(जे काही उत्पन्न होणारे धर्म आहेत हे सर्व नष्ट होणारे धर्म आहे. )
अशाप्रकारे निरोध म्हणजे निर्माण अर्थात अमृताचा अनुभव घेऊन सारीपूत्त स्श्रोतापन्न झाले. ते प्रसन्नचित्ताने आपला मित्र मोग्गलान जवळ गेले त्यांना घडलेले सर्व सांगितले मोग्गलानने हे एकूण त्यांचेही ज्ञानचक्षु उघडले त्यांनी ही अमृत चाखले आणि स्श्रोतापन्न झाले आणि अशाप्रकारे दोघेही भगवान बुद्धाचे शिष्य झाले.
आयु भिकाजी सुरडकर बदलापूर
Post a Comment