एक
श्रमक नावाचा बोधिसत्व पुष्कलावती मध्ये राहत होता.. आणि आपल्या आई-वडिलांची सेवा करीत होता ..एके दिवशी तो आपल्या आई वडिलांना काही फळ आणण्याकरीता तो जंगलात गेला आणि अशावेळी एक राजा शिकार करण्याकरीता अरण्यामध्ये आला होता. आणि चुकून तो विषारी बाण बोधिसत्व श्रमक याला लागला.... परंतु या कथेमध्ये बोधिसत्व श्रमक याला तो बांण लागल्यानंतर तो घाव भरून आला आणि औषधाने ठीक झाला .. आपल्याला दिसत असलेल्या वरील शिल्पामध्ये आपण जे शिल्प बघतो त्या शिल्पांमध्ये एक मुलगा आपल्या आई-वडिलांना पालखीमध्ये घेऊन जात आहे अशा प्रकारचे शिल्प आपल्याला भारतात नव्हे तर चीनमध्ये बघायला मिळते..वास्तविक ही जी कथा आहे ही जातक कथेतील आहे.. जो श्रमक नावाचा बोधिसत्व आपल्या आई-वडिलांचा सेवा करीत होता
अशा बोधिसत्त्वाचा स्तूप पुष्कलावतीमध्ये बनवण्यात आला होता त्याचा
उल्लेख ह्युयनत्संगने आपल्या प्रवास वर्णनामध्ये केलेला आहे आणि हीच
कथा नंतर श्रवण कुमार च्या नावाने प्रसिद्ध झाली.वरील शिल्प हे आपण
चीनमध्ये बघु शकतो..
आयु.. भिकाजी सुरडकर बदलापूर
Post a Comment