गांधार कला
गांधार कला
तथागत भगवान गौतम बुद्ध यांचेही शिल्प आपण बघू शकतो . या शिल्पामध्ये सिद्धार्थ गौतम एका छोट्या रथात बसले आहे.तसेच त्या रथाला दोन मेंढे जुंपलेले आहे आहे. तसेच पाठीमागे झाडाखाली उभे असलेला सेवक त्यांच्याकडे हात जोडून उभा आहे.तसेच भगवान बुद्धाचा एक हात हा अभय मुद्रेत असल्याचा दिसतो. तसेच त्याच्यासोबत असलेले त्यांचे सोबती मित्र आहे आणि त्यांच्या हातामध्ये पुस्तक आणि दऊत दिसते.
. हे जे शिल्प आहे ते त गांधार शैलीतील आहे.या शिल्पामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाला बालक न दाखवता हे बुद्ध आहे हे ओळखण्याकरता त्यांना बुद्धाचा चेहरा जोडला आहे.शिल्पकार आणि त्यांच्या पाठीमागे एका झाडाचे सुद्धा प्रतिमा दाखवलेली आहे. त्याच्या पाठीमागे आणि इतर सेवक आणि विद्यार्थी सर्व मिळून त्यांना शाळेमध्ये सोडण्याकरता चाललेले आहे. छोट्या रखाला जे मेंढे जोडलेले आहे त्यावरती फार सुंदर असे नक्षीकाम केलेले आपल्याला दिसते. तसेच शिल्पामध्ये भगवान बुद्धाच्या अंगावरील चीवर आपण स्पष्ट बघू शकतो. ही शिल्पकला गांधार शैलीतील असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्याची ठेवण ही पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान यांच्या मानवाच्या मुखासारखी दिसते. इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये म्हणजेच कनिष्काच्या काळामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती पहिली मूर्ती तयार करण्यात आली आणि त्यानंतर भगवान बुद्धांच्या इतर प्रतिमा ह्या आपल्याला बुद्ध रूपामध्ये असल्याचे आढळते. लेणीमध्ये ज्या थेरवादी परंपरेमध्ये स्तूपाची पूजा केली जात होती ..त्या ठिकाणी नंतरच्या काळामध्ये भगवान बुद्धांच्या बुद्ध रूपाची पूजा करण्यात येत होती. अशा प्रकारची अनेक शिल्प आपल्याला लेणीमध्ये बघायला मिळतात.
आयू . भिकाजी सुरडकर बदलापूर
Post a Comment