भीम स्मरण आणि भीम स्तुती
भीम स्मरण
सकलं विज्जं विदुरञ्ञानं देवरुपं सुजिव्हं |
निमल चक्खु गभिर घोसं गोरवण्णं सुकायं||
अभय चित्तं निभय कामं सुरत धम्मं सुपेम|
विरत रज्जं सुजननेतं भीमरावं सरामि|
भीमरावं सरामि,भीमरावं सरामि||
भीम स्तुती
दिव्यप्रभरत्न तु, साधू वरदान तूं
आद्य कुल भूषं तू भीमराजा ||१||
सकल विद्यापती, ज्ञान सत्संगती
शास्त्र शासनमति, बुद्धी तेजा ||२||
पंकजा नरवरा,रत्त स्वजन उद्धारा
भगवंत आमचा खरा, भक्तकाजा ||३||
चवदार संगरी ,शस्त्र धरिता करी,
कापला अरी उरी,रौद्र रुपा||४||
मुक्ती पथ कोणता,जीर्ण स्मृती जाळीता,
उजाळील्या अगतिका मार्ग साजा||५||
राष्ट्र घटना कृती, शोभते भारती
महामानव बोलती सार्थ सज्ञा ||६||
सरण बुद्धास |सरण धम्मास |
सरण संघास ,मी भीमराजा||७||
Post a Comment